14 नोव्हेंबर 2022 पंडित जवाहरलाल नेहरू जयंती
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आदर्श महाविद्यालय उमरगा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीचे स्वरूप पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले ही जयंती बाल दिन व बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरी करण्यात येते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप गरुड सर उपप्राचार्य डॉ कुलकर्णी सर व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…….
आदर्श महाविद्यालय उमरगा येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मात्र सुरक्षा कुटुंब सुरक्षा हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय उमरगा व महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये महिला विषयी आरोग्याच्या असणाऱ्या तक्रारी व समस्या यांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले
19 नोव्हेंबर 2022 श्रीमती इंदिरा गांधी जयंती
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी आदर्श महाविद्यालय, उमरगा येथे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या पूजनानंतर राष्ट्रीय एकात्मतेची शपथ,उप-प्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांना देण्यात आले या कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्य डॉ .डी.पी. गरुड व उपप्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संध्या सगर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते💐💐✨ | ![]() |
![]() |
1 डिसेंबर 2022 एड्स दिन
1 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागरण अभियान रॅली काढण्यात आली ठीक 10 : 30 मिनिटाला आदर्श महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.डी.पी गरुड सर, उपप्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी कार्यक्रमाधिकारी डॉ.बी.आर.शिंदे सर यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. ही रॅली आदर्श महाविद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत व नगरपरिषद येथून हुतात्मा स्मारक पर्यंत काढण्यात आली या रॅलीमध्ये घोषवाक्य निर्मूलन यावरती देण्यात आली. त्यासोबतच पदनाट्य व शेवटी एड्स विषयाची शपथ घेऊन या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये अनेक प्राध्यापक व विद्यार्थी,कर्मचारी व्यवस्थेतील ग्रामीण शासकीय रुग्णालय, उमरगा येथील कर्मचारी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून एड्स जनजागृती करण्यात आले. | ![]() |
|
![]() |
6 डिसेंबर 2022 महापरिनिर्वाण दिन
आदर्श महाविद्यालय उमरगा येथे दिनांक 6 डिसेंबर रोजी ठीक अकरा वाजता महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉएस जी कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सौ संध्या सगर डॉ ए सी गायकवाड डॉ बी आर शिंदे यांनी केले. यानंतर सामूहिक पंचशील म्हणण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस जी कुलकर्णी अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे डॉएसी गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉएस जी कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलत असताना डॉ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना त्यांच्या संघर्षमय जीवनाची त्यांनी ओळख सांगितले लहानपणापासून ते भारतीय संविधान तयार करेपर्यंत चा जीवन प्रवास व्याख्यानात व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना डॉ एसी गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या पत्रांचा सामाजिक जीवनावर कसा परिणाम होतो यावर त्यांनी भाष्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बालाजी पिडगे व प्रास्ताविक प्राध्यापक लक्ष्मणराव बिराजदार यांनी केले तर आभार उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय सौ संध्या सगर यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते | ![]() |
![]() |
Webinars Arranged by College & departments
Webinar Topic | Level | Oganised by | Dated | Watch webinar here |
Current perspectives in Chemical Science |
International Level | Department of chemistry, industrial Chemistry & IQAC | 21st Nov. 2022 | click here |
Intellectual Property Rights and Patent Filing |
National level | IQAC & Adarsh Mahavidyalaya, omerga | 01st Dec. 2022 | click here |
STATE LEVEL WEBINAR on CYBER SECURITY |
State Level | Department of Computer Science & IQAC | 16th Dec. 2022 | click here |
Corona: Past, Present and Future |
State Level | IQAC, Department of Microbiology in association with the microbiologist Society of India | 19th Dec 2022 | click here
|
3 जानेवारी 2023 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती
आदर्श महाविद्यालय उमरगा येथे दिनांक 3 जानेवारी रोजी ठीक 11:00 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुरेश कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ संध्या सदर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते | ![]() |
06जानेवारी 2023 पत्रकार दिन
दिनांक 06जानेवारी 2023 रोजी आदर्श महाविद्यालय उमरगा येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उमरगा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर पत्रकारांनी त्यांच्या बैठकीमध्ये सध्याची पत्रकारिता यावर चर्चा करण्यात आले या पूर्वीचे पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यामध्ये खूप अशी तफावत जाणवत असल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले या बैठकीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड उपस्थित होते | ![]() |
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन
आदर्श महाविद्यालय मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर नाम विस्तार दिनाच्या औचित्य साधून निबंध स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते यामध्ये विजेत्यांची सन्मानपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी पी गरुड सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर ते सखोल असं मार्गदर्शन केले ते आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणामध्ये असणारी समानता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट केल्याचे सांगितले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ एस जी कुलकर्णी यानी नामांतराचा लढा संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ बी आर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ बी एस खरोसे यांनी केले |
![]()
|
26 जानेवारी 2023 – प्रजासत्ताक दिन
![]() |
![]() |
![]() |
26 जानेवारी 2023 हा 74 वा प्रजासत्ताक दिन आदर्श महाविद्यालय उमरगा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान अर्पण करत असलेल्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले माननीय श्री भांडेकर सर संचालक श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर ध्वजारोहण करण्यात आले ध्वजा रोहनानंतर राष्ट्रगान म्हणण्यात आले ठीक आठ वाजून दहा मिनिटाला ध्वजारोहणाला सुरुवात झाली व राष्ट्रगानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांना उद्देशिकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ डी पी गरुड संचालक श्री मल्लिनाथ जी दांडगे साहेब भाऊरावजी सोमवंशी साहेब प्राचार्य सोमशंकर महाजन प्राचार्य विजयजी सरपे प्राचार्य भीमाशंकर जी सारणे उपप्राचार्य कुलकर्णी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उद्देशिकेसोबत प्रार्थना सुद्धा म्हणून घेण्यात आली |